जीवन आनंद संस्था संचलित माँ आसरोघर आश्रमच्या वर्धापनदिनी गोव्यातील ओपा खांडेपार येथे वृक्षारोपन संपन्न

खारेपाटण ( प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्था संचलित गोव्यातील ओपा खांडेपार फोंडा येथील माँ आसरोघर आश्रमाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या तीस-या वर्धापन दिनानिमित्ताने येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला. माँ आसरोघर आश्रम जवळच्या रस्त्यावर खुंटादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपनाचा हा छोटेखानी कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने व सहभागाने संपन्न झाला.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब रस्त्यावरच्या निराधार वंचितांचे पुनर्वसन ,कुटुंब पुनर्मिलन आणि त्यांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळण्यासाठी जसे कार्य करतात.तसेच संदिप परब हे जाणीवपुर्वक समाजातील मान्यवर मंडळी विद्यार्थी आश्रमांतील बांधव आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने नियमितपणे दरवर्षी पर्यावरण संवर्धानासाठी वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता,मोहिमा, प्लँस्टिक प्रातिबंध व निर्मुलनासाठी कापडी पिशव्यांचा प्रचार प्रसार इ.उपक्रम हाती घेत असतात.

या कार्यक्रमाला म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालयाचे प्राचार्य मान.डाँ.संतोष पाटकर , जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचेसह संस्थेच्या विश्वस्त पुनम बुर्ये, जेष्ठ मार्गदर्शक प्रेमानंद नाईक ,विश्वस्त किसन चौरे, आश्रमच्या हितचिंतक व शेजारी पुष्पा गावकर काकु, गोवा समन्वयक प्रसाद आंगणे,मयुरी लोट, श्रेयस मेस्त्री ,ईश्वरी तलावणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांचेसह आश्रमातील बांधव व कार्यकर्त्यांनी यावेळी वृक्षारोपन केले. आश्रमचे युवक कार्यकर्ते कुमारी लक्ष्मी बात्रा, कुमार सोनु बात्रा यांचेसह आश्रमातील बांधव चिन्हू सुधाकर मधाळे, बाबाजी साळकर यांचा वृक्षारोपनात सहभाग होता.

error: Content is protected !!