संदीप सरवणकर यांच्या सौजन्याने करण्यात आले वह्यावाटप
वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, उंबर्डे हायस्कूल, येथील सभागृहात, आज दि.२४ जून रोजी, महिला स्वाधार मंच व उध्दव बाळासाहेब ठाकरे (युवासेना) च्या संयुक्त विद्यमाने ,शालेय मुलांना, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, यांच्या वाढदिवसणानिमित्त वह्याचे मोफत वाटप केले गेले. निवृत्त पोलीस अधिकारी तथा शिवसेना उबाठा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्या सौजन्याने हे वह्यावाटप करण्यात आले. संदीप सरवणकर यांच्या सौजन्याने एकूण 300 विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात येणार आहे. त्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र समजावून सांगितला.
त्याच प्रमाणे कार्यक्रमास उबाठा उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, निवृत्त पोलिस अधिकारी शशी पवार,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जावेद पाटणकर ,गौस पाटणकर, नासीर रमदुल, मनोहर दळवी, दिपक चव्हाण, ज्येष्ठ नागरिक तुकाराम सरवणकर हे सर्व विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच दहावी चे गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आदर्श उद्योजक दत्ता काटे हे होते. संदीप सरवणकर यांनी सदरचे शैक्षणिक साहित्य प्रायोजित केले होते.त्यांच्या मातोश्री महिला स्वाधर मंचच्या अध्यक्षा व वैभववाडीच्या माजी पंचायत समिती सभापती माई सरवणकर ह्या सदर हायस्कूल च्या मुलांना महिला स्वाधार मंचचे माध्यमातून गेले ३२ वर्षे याच प्रमाणे विद्यार्थ्यांना सातत्याने शिक्षण साहित्य वाटप करत असल्याने, उपस्थित सर्वाने त्यांच्या या कार्याबद्दल, आपल्या भाषणातून गौरव उद्धगार काढले. मुख्याध्यापक राठोड यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले व प्रस्तावना ही केली त्यात त्यांनी शाळेचा चढता आलेख पाहुण्यांना वदवून दाखविला. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन पाटील गुरुजी यांनी केले. त्याच प्रमाणे, उद्या पर्यंत,उंबर्डे येथील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा वह्याचे वाटप केले जाणार आहे. एकूण ३०० विद्यार्थ्यांनी याचा लाभ दिला जात आहे.