तळेरे (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पोंभुर्ले विभागातील भाजपाच्या सरपंच व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश उर्फ बंड्या नारकर, उदय पाटील, विश्वनाथ खानविलकर, नितेश गुरव, संदेश मांजरेकर, उमेश गवाणकर, महेश पडवळ, कृष्णकांत आडीवरेकर, ज्ञानेश्वर गुरव, अरुण पवार, अजित पवार, मंगेश गुरव, काका देवस्थळी, अनिल राणे, अवधूत आपटे, संजय मसुरकर, मनीष बेडेकर, संतोष राणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.