पर्यटन व्यावसायिक महासंघतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न – बाबा मोंडकर..!

फ्लाय 91 विमान कंपनीच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांना मोफत विमान प्रवास

फ्लाय 91 विमानसेवा व पर्यटन महासंघाच्या समन्वयाने बंगळुरू आणि हैद्राबाद येथील टुर ऑपरेटरची सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौरा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून प्रामुख्याने पावसाळी पर्यटन वाढीचा उद्देश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि फ्लाय 91 या विमान कंपनीच्या समन्वयाने बंगळुरू आणि हैद्राबाद येथील टूर्स ऑपरेटर यांचा पर्यटन अभ्यास दौरा संपन्न झाला असून पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुका अध्यक्ष अवि सामंत व पर्यटन महासंघाचे सल्लागार गुरु राणे यांच्या प्रमुखत्वाखाली सदर अभ्यास दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटना बरोबर ऍग्रो, हिस्ट्री, मेडिकल, कल्चरहिल, फूड टुरिझम वाढीसाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टुर ऑपरेटर यांना देण्यात आली बीच टुरिझम बरोबर, सावंतवाडी येथील लाकडी खेळणी गंजिफा आंबोली थंड हवेचे ठिकाण वैभववाडीतील भीमाने बकासुराचा वध केलेली पांडवकालीन गुफा जिल्ह्यातील गड किल्ले मँग्रोज सफर जंगल सफर विषयी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांनी विशेष लक्ष केंद्रित करून पर्यटन व्यावसायिक महासंघा सोबत काम करून बंगळुरू आणि हैद्राबाद येथील पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी टुर आयोजित केले जाणार असून आलेल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील त्या त्या भागातील हॉटेल रेस्तोरंट रिक्षा फोरव्हीलर स्थानिक गाईड व्यावसायिकांची माहिती संकलित करून देण्याचे काम पर्यटन महासंघाने चालू केले असून लवकरच ही माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांना दिली जाणार आहे. यासंबंधी अवि सामंत यांच्या हॉटेल आदिज देवबाग याठिकाणी यासंदर्भात फ्लाय 91 विमानसेवा मार्केटीग अधिकारी जोशी पर्यटन महासंघ मालवण तालुका अध्यक्ष अवि सामंत पर्यटन महासंघाचे सल्लागार गुरुनाथ राणे, सचिन गोवेकर तसेच अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टूर ऑपरेटर यांची मिटिंग झाली यावेळी अभ्यास दौऱ्यावर आलेल्याचे स्वागत पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात आले तसेच यावेळी फ्लाय 91 विमानसेवा अधिकारी यांनी सांगितले की जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हॉटेल पर्यटन व्यावसायिक बंगळुरू हैद्राबाद येथे फिरण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसंदर्भात आपल्या व्यवसायाच्या माहिती देण्यासाठी जात असतील तर कंपनीची सिंधुदुर्गातून बंगळुरु आणि हैदराबाद अशी उड्डाणे आता बॅ.नाथ पै चिपी विमानतळा वरून नियमीत पणे सुरू आहेत या मध्ये पर्यटन महासंघाच्या सभासदां कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरु या दोन्ही ठिकाणसाठी विमान प्रवासाची तिकिटे मोफत उपलब्ध करून दिली आहेत.कंपनीच्या या देकारा अंतर्गत यंदाच्या वर्षी 31 ॲागष्ट 2024 या कालावधीत सिंधुदुर्गातील वरील मार्गावरच्या उड्डाणातील प्रत्येक विमानात जाती व येती दररोज 15 तिकीटे मोफत उपलब्ध करून दिली आहेत जाणार असून प्लाय 91 ची सिंधुदुर्ग -बंगळुरु – सिंधुदुर्ग ही उड्डाणे सोमवार,बुधवार व शनिवारी असून हैद्राबाद साठी शुक्रवार व रविवार अशी विमानसेवा सुरू आहे.या मोफत तिकिटांसाठी इच्छूकांनी support@fly91.in किंवा Naimish.joshi@fly91.in या इमेलवर किंवा 9909000363 या क्रमांकावर आपली माहिती पाठविण्याचे आवाहन केले तसेच याविषयी पर्यटन महासंघाचे प्रतिनिधी अवि सामंत व गुरुनाथ राणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विष्णू उर्फ बाबा मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!