सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस बुद्रुक गावातील एका प्रसिद्ध कॉलनी येथे १५ जानेवारी रोजी रात्री विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रसिद्ध कॉलनीत राहत असलेल्या बहिणीच्या घरातून १५ रोजी रात्री ९ वाजता तेथीलच एका संशयित आरोपीने तिच्या अंगावर चिठ्ठी फेकली. त्यामुळे तिने आपल्या बहिणीला कॉल केला. बहीण आल्यावर या दोघांच्यात बोलणे सुरू असताना संशयित त्यांना काठी घेवून मारायला आला. त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील शब्दात शिवीगाळ केली. तसेच एकीचा गाऊन फाडला. या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत कासार हे करीत आहेत.