कासार्डे जि. प. मतदारसंघात भाजपा आणखी मजबूत
कणकवली (प्रतिनिधी) : जि. प. मतदानाच्या तोंडावर ठाकरे सेनेला आणखी झटका बसला असून कणकवली तालुक्यातील उबाठा सेनेचे तोंडवली-बावशी ग्रामपंचायत सदस्य मनश्री हेमंत कांडर तसेच तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष हेमंत सुरेश कांडर यांसह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा आणखी मजबूत झाली आहे. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पालकमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहन खडपे, जनार्दण खडपे, सविता खडपे, दिगंबर कांडर, करण कांडर, तात्या तेली, संतोष तेली, लश्मन तेली, संगिता तेली, वासूदेव तेली, राजेंद्र कांडर, नामदेव कांडर, उद्धव कांडर बुवा यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.












