आचरा (प्रतिनिधी) : चिंदर पाटणवाडी येथे पाटणकर परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आज 3 फेब्रुवारी राेजी आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने रात्री ९ वाजता, जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली आरोस यांचा महान दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. नाट्य प्रयोगात दिग्गज दशावतार नाट्य कलावंत आपली नाट्यकला सादर करणार असून दशावतार नाट्य प्रेमिनी नाट्य प्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन गजानन पाटणकर आणि भावकी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
चिंदर पाटणवाडी येथे आज दशावतार नाट्य प्रयोग….!












