वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रशाळा खांबाळे नं. १ येथे परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क (मुंबई) यांच्या वतीने साउंड सिस्टीम भेट देण्यात आली.
करून देण्यासाठी राजेंद्र बळीराम देसाई यांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळेस ही सुविधा प्राप्त झाली.सदर साउंड सिस्टीम शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.या कार्यक्रमास सरपंच प्राजक्ता कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन साळुंखे, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर देसाई, ठाणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल देसाई, उपसरपंच मंगेश गुरव, तंटामुक्त समिती अध्यक्ष लवू पवार,माजी सरपंच विठोबा सुतार, सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण, केंद्रप्रमुख श्री.कदम,शिक्षक हनुमंत सुतार, सोलापूर मॅडम यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क (मुंबई) यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी असून, या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व समस्त खांबाळे ग्रामस्थांच्या वतीने मंडळाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.












