वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा सेनेचे अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांच्यासह वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे,कुंभवडे,नाधवडे,हेत येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सर्व कार्यकर्त्यांचे पालकमंत्र्यांनी पक्षात स्वागत केले आहे.
कोकिसरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन कोर्लेकर, कुंभारवाडीचे अध्यक्ष सदानंद खेडेकर,अनिता कुडाळकर,दीपक निळेकर, तुकाराम गुरव यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे.
तर हेत गावच्या माजी सरपंच सौ प्रतीक्षा फोंडके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे कुंभवडे व नाधवडे येथील कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी यावेळी मंडळ अध्यक्ष सुधीर नाकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,भालचंद्र साठे,जयेंद्र रावराणे, नासीर काझी, शारदा कांबळे,प्रमोद रावराणे,,प्राची तावडे, श्रद्धा रावराणे, स्नेहलता चोरगे व पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी केलेली या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे याचा फायदा भाजपाला होणार आहे.तर उबाठा सेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.












