चर्मकार समाज उन्नती मंडळातर्फे कणकवलीत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा कणकवलीच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६५० जयंती मोठ्या उत्साहामध्ये सल्लागार चंद्रकांत भोसले यांच्या घरी साजरी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव उपस्थित होते. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर संत रविदास महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केले पाहिजे आणि आपण सर्वांना समानतेची वागणूक दिली पाहिजे. त्यातूनच आपली प्रगती निश्चित आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले. जाती समानता व एकता समाजाला प्रगतीपथावर नेणारी असते या गोष्टीचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि प्रत्येकाने समाज प्रगतीमध्ये सहभाग घेतला पाहिजे असे मत तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यावेळी महानंदा चव्हाण – माजी तालुकाध्यक्ष, अविनाश चव्हाण – माजी तालुका सचिव, अनिल चव्हाण – प्रशासन अधिकारी पंचायत समिती कणकवली, सिताराम पवार – सल्लागार, संतोष जाधव – उपाध्यक्ष, जगदीश चव्हाण – विभाग प्रमुख, मंगेश साळस्कर – माजी सहसचिव, नितीन पवार, लवेंद्र किंजवडेकर – माजी सचिव, प्रणाली म्हापणकर – महिला सदस्य, प्रवीण म्हापणकर, चंद्रकांत भोसले, अशोक नारकर, सुधीर जाधव – सल्लागार, विनायक भोसले, केशव पावसकर, दीपक चव्हाण, सुभाष जाधव, नामदेव जाधव – जिल्हा कोषाध्यक्ष, सत्यविजय जाधव – तालुका कार्याध्यक्ष, चंद्रकांत चव्हाण, प्रभाकर चव्हाण – हळवल ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश वाघेरकर – युवा अध्यक्ष, आनंद जाधव – जिल्हा सदस्य, राजेंद्र चव्हाण – जिल्हा उपाध्यक्ष, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी स्वागत व आभार तालुका सरचिटणीस मंगेश आरेकर यांनी मानले.

error: Content is protected !!