कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात दुचाकी बेवारस स्थितीत

कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील भाजपच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत गेले काही काही दिवस दुचाकी बेवारस स्थितीत आहे. उपजिल्हा रुग्णालय समोरील जागेत भाजपच्या कार्यालयाचे काम सुरू आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत गेले काही दिवस दुचाकी उभी आहे. ही दुचाकी अशी बेवारस का सोडून देण्यात आली आहे. कणकवली दुचाकी व चारचाकी वाहने चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातील अनेक वाहनांचा अद्याप तपास लागलेला नाही. रस्त्यावर बेवारस स्थितीत उभी वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्याचा नियम आहे. मात्र, सदरील वाहन त्काही दिवसांपासून उभेच आहे. रात्री परिसरात सामसूम असल्याने दुचाकी चोरी होण्याचीही शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी वाहन मालकाचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे ठाण्यात केली आहे. मात्र, पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!