आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये वन डे मार्केट उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता शालेय जीवनापासूनच व्यवहारिक ज्ञानाची सवय लागावी या उद्देशाने आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे तर्फे गेल्या पाच वर्षापासून वन-डे मार्केट अर्थात एक दिवसीय बाजार हा उपक्रम राबविण्यात येतो
यावर्षी हा उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला, खरेदी विक्री प्रक्रिया, ग्राहकांशी संवाद, गणिती हिशोब किताब यांचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी या उपक्रमाची संकल्पना राबविण्यात येते या उपक्रमांतर्गत प्रशालेतील इयत्ता नववीच्या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या तसेच घरघुती पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते वरवडे गावातील नागरिकांनी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, भाज्या व पदार्थांची खरेदी केली तसेच प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला

या कार्यक्रमाचे उदघाटन ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल, मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख वैष्णवी मोरवेकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले त्यानंतर एकदिवसीय बाजार सुरु झाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वस्तू विक्री करत व्यवहार ज्ञानाचा आनंद घेतला, या कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

error: Content is protected !!