कुडाळमध्ये उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आज सायंकाळी स्वतः सभास्थळी जाऊन पाहणी केली. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या सभेचे नियोजन अतिशय चोख ठेवले असून, मैदानावर भव्य व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांसाठी मोठी आसनव्यवस्था करण्यात येत आहे.

निलेश राणे यांनी सुरक्षेच्या उपाययोजना आणि सभेच्या एकूण व्यवस्थेची बारकाईने माहिती घेतली. या सभेला कुडाळ आणि मालवण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. अशा वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा महायुतीच्या उमेदवारांसाठी विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पाहणी दौऱ्यावेळी रवींद्र फाटक, काका कुडाळकर, राजेश मोरे, अभिषेक गावडे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!