पत्रकार संजय खानविलकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा..!

श्री गांगेश्वर मंदिर तळेरे देवराई परिसरात एकावन्न विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण

आचरा (प्रतिनिधी) : पत्रकार तथा निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसा निमित्त श्री गांगेश्वर मंदिराच्या देवराई (तळेरे) परिसरात एकावन्न विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करून वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, शशांक तळेकर, दादा महाडिक, डॉ.अभिजीत कणसे, पत्रकार निकेत पावसकर, दत्तात्रय मारकड, सतीश मदभावे, प्रा.प्रशांत हटकर, प्रा.हेमंत महाडिक, बी.काॅम.बॅचच्या मैत्री परिवारातील कणकवलीचे संतोष तवटे, जयराम डामरे, मनोज सावंत, बाळू पाताडे, संतोष तळेकर, गणेश राणे व इतर मित्रमंडळी आणि निसर्ग मित्र परिवारातील सहकारी मित्र आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!