आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदरला आज श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा कडून “ग्रंथालय भेट आणि पुस्तकं भेट” उपक्रमातर्गत 135 पुस्तकं भेट देण्यात आली. सार्वजनिक वाचनालय आचरा ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी पुस्तकं भेट उपक्रमा बाबत सविस्तर विचार मांडले.
यावेळी आचरा सार्वजनिक वाचन मंदिर अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन (दादा) बापर्डेकर, कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश परुळेकर, विरेंद्र पुजारे, भिकाजी कदम, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी, कर्मचारी महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण.
श्री देवी सरस्वती वाचनालय उपाध्यक्ष संतोष पाताडे, कार्यवाह हेमांगी खोत, कार्यकारिणी सदस्य हिमाली अमरे, गोपाळ चिंदरकर, प्रकाश खोत, विवेक परब, ग्रंथपाल स्वरा पालकर, भूषण दत्तदास आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि समारोप कार्यवाह हेमांगी खोत यांनी केले.












