ब्यूरो न्यूज (मुंबई) : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी झाले आहेत. विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष केला. मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली.
ठाकरे गटाचे अनिल परब विधानपरिषद निवडणुकीत विजयी; भाजपला जबरदस्त झटका












