ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : मैत्रिणीकडे वाढदिवसाला जाते, असे आई-वडिलांना सांगून नातेवाईकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपातून देवगड तालुक्यातील पोयरे येथील सागर जयवंत जाधव याची ओरोस येथील सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
लॉकडाऊनच्या कालावधीत फेसबुकवर सोशल मीडियावर झालेल्या ओळख व मेत्रीतून आरोपीने सदर अल्पवयीन मुलीला त्याच्या नातेवाईकांच्या वाढदिवसाला बोलावून घेतले. त्यामुळे सदर मुलीने घरी मैत्रीणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून ऑगस्ट २०२१ मध्ये ती तालुक्यातील नातेवाईकांजवळ आली. दुसऱ्याच दिवशी पहाटे आरोपीने तीला त्याच्या मोटारसायकवरून फिरायला नेले.
दरम्यानच्या कालावधीत तीचा शोधाशोध करून नातेवाईकांनी पोलीसांत फिर्याद दिली होती. त्यावरून तीचा शोध घेतला असता ती आरोपीसोबत आढळून आली. त्यामुळे आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत सरकार पश्नाकडून पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तपावती व सबळ पुरावा न आल्याने आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.