वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणातील विद्यार्थ्याना सर्वोत्तम फूड टेकनॉलॉजिचे शिक्षण वाजवी शुल्का मध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2013-14 साली श्री. अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ सांगुळवाडी या संस्थेने अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी. तालुका– वैभववाडी, जिल्हा–सिंधुदुर्ग येथे सुरू केले. अन्नतंत्रज्ञान पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या 90% विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील अंतिम वर्षाची विद्यार्थीनी कु. धनश्री अशोक कोरवी हिची Britannia या नामांकित कंपनीमध्ये Production Manager या पदावर निवड झाली असून तिला वार्षिक ७ लाख रु. एवढे वेतन देण्यात आले आहे. महाविद्यालयातून दरवर्षी ९०% ते ९२% विद्यार्थ्याना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करून देण्यामध्ये महाविद्यालय यशस्वी ठरले आहे. शैक्षणिक वर्ष २०१४ पासून महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व २०१७-१८ पासून अन्नतंत्रज्ञान पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या 90% विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. मागील काही वर्षांमध्ये महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थी ITC, Reliance Retail Industry, Britannia, D-Mart,United spirit, Pepsico, Frostee frozen food, monginis,ssom international foods,skyline foods,Pernod Ricard अशा नामांकित कंपन्यांमध्ये Production manager, production Incharg,Quality Manager, Quality Incharge, Quality Assurance,Quality Control अशा विविध पदांवर नियुक्त झालेले आहेत.
धनश्री कोरवी हिची निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले सर तसेच प्राचार्यमहेश कदम यांनी अभिनंदन केले आहे.












