नांदगाव (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय ,फोंडाघाट येथील कृषीच्या अंतिम वर्षाच्या कृषीदुतांकडून ग्रामिण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत नांदगांव मध्ये अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
अझोला म्हणजे काय व त्याचे फायदे कोणते ?
अझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शैवाल आहे. निळे–हिरवे शैवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगलेल्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. अझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी अझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे. अझोला अन्य घन आहारात मिसळून किंवा नुसताच जनावरांना देता येतो; हा कोंबड्या, शेळ्या, मेंढया, डुकरे आणि ससे यांनाही देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे अझोलाचे उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते.
नांदगांवमध्ये राजेश देसाई याच्या सहकार्याने त्यांच्या शेतामध्ये अझोला लागवड व तेथील शेतकऱ्यांना अझोला संबंधी मार्गदर्शदेखील करण्यात आले. अझोला वनस्पतीची लागवड व उत्पादनाच्या प्रात्यक्षिक व मार्गदर्शनासाठी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट चे प्राचार्य.श्री संते आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. एस मोटे , प्रा.एस एस शिर्के आणि विषय शिक्षिका प्रा.कविता पुजारी यांच्या मार्गदर्शनातून कृषीदूत रणजीत डोंबाळे, रितेश मोरे, सौरभ पाटील, गणेश भोसले, पांडुरंग मिसाळ, सौरभ पिसे, प्रज्ञेश लळित, ऋषिकेश जाधव, बालाशिवा, शिवानागेंद्र यांनी शेतकऱ्यांना माहि












