फोंडाघाट (प्रतिनिधी) : तालुक्यात मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला असून घोणसरी गावातील आयरेवाडी येथील पांडुरंग जाधव यांच्या घरावर झाड पडुन नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.घोणसरी आयरेवाडी येथील श्री.पांडुरंग वसंत जाधव यांच्या घरावर आज सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आंब्याचे झाड कोसळले. यात जाधव यांच्या घराच्या छप्पराचे अंदाजे पाउण लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.महसूल यंत्रणेला याबाबत कळविण्यात आले असून पावसाचा जोर कायम आहे.
घोणसरीत घरावर झाड पडून नुकसान












