आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कला अकादमी ची स्थापना करावी अशी मागणी राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मुंबई येथील विधीमंडळात भेट घेत केली. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध लोककला सादर करणारे कलाकार मोठ्या संख्येने तयार होत आहेत. कला अकादमी च्या माध्यमातून त्यांचा कलेला अधिक वाव आणि विस्तारित व्यासपीठ मिळेल.तसेच त्यांच्यात एकजुटीची भावना वाढीस लागेल. त्यासाठी सिंधुदुर्गात कला अकादमी ची निर्मिती करावी अशी मागणी कानडे यांनी केली आहे.












