महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ च्या पाठपुराव्याला यश
जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे मानले आभार
ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन् .ई १३६ जिल्हा सिंधुदुर्ग च्या सततच्या पाठपुराव्यामुळे ६ ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पदोन्नती व ग्रामसेवक संवर्गातून १३ ग्रामविकास अधिकारी पदोन्नतीचे आदेश प्राप्त झाले.
संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एकाच वेळी १९ ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांची पदोन्नती जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली यासाठी श्री मकरंद देशमुख साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) विशाल तनपुरे यांचे तसेच जिल्हा परिषद मधील सर्व अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत विभाग यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम, सरचिटणीस संतोष पालव कार्याध्यक्ष प्रसाद ठाकुर, उपाध्यक्ष संदीप गवस, कोषाध्यक्ष सुनील प्रभुदेसाई, सह सचिव प्रवीण नेमण, सावंतवाडी अध्यक्ष अर्जुन कुबल, सावंतवाडी सरचिटणीस श्रीधर राऊळ तसेच सर्व पदोन्नती झालेले विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
सदरच्या पदोन्नतीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे ग्रामसेवक युनियन कडून आभार मानले व पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांचेही संघटना जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी अभिनंदन केले. ग्रामविकास अधिकारी पदी बढती मिळालेल्या. ग्रामसेवकांची नावे पुढीलप्रमाणे : शमसुददीन अब्बास साटविलकर गभालचंद्र अंकुश सावंत,आनंद लाडोजी परब, चंद्रकांत अर्जुन शेडगे, महेश तुकाराम चव्हाण, राजेंद्र दत्ताराम सावंत, प्रफुल्ल शशिकांत धुरी, अरविंद जिजबा कांबळे, सदगुरु अर्जुन गावडे, राजेंद्र शिवराम देसाई, मिलन लक्ष्मण सावंत / देसाई,राजेश तुळशीदास निवतकर, संतोष बाबू कविटकर. तसेच विस्तार अधिकारी पदी बढती मिळालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : बस्त्याव डुमिंग पिंटो, नारायण सिताराम माणगांवकर, आत्माराम महादेव परब , गणेश महादेव परब, श्रीरंग अशोक जाधव.












