पंतप्रधान मोदींचे एक पेड़ माँ के नाम अभियान
आचरा (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड़ माँ के नाम” या अभियानांतर्गत आज माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाम. नारायण राणे यांनी कुडाळ, पडवे येथे वृक्षारोपण केले.
यावेळी सौ. निलम ताई राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जेष्ठ नेते राजु राऊळ, ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, सुप्रीया वालावलकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












