कोकण रेल्वेच्या आजही अनेक गाड्या रद्द ; प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे वृत्त

अनेक गाड्या रद्द

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिवाणखवटी जवळील नातूवाडी बोगद्याजवळ कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी रविवार 14 जुलै रोजी सुटणाऱ्या 20111 कोकण कन्या एक्सप्रेस, 12133 सीएसटीएम मेंगलोर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या तर 15 जुलै रोजी सुटणाऱ्या 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस, 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, 10105 दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस, 501070 सावंतवाडी मडगाव पॅसेंजर ह्या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर लांब पल्ल्याच्या 12 गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

आज 15 जुलै रोजी सुटणाऱ्या 11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस, 10104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस, 12134 मंगलुरु मुंबई एक्सप्रेस ह्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

error: Content is protected !!