माध्यमिक विदयालय मांडकुली- केरवडे प्रशालेत गरीब व गरजु विद्यार्थ्यांना माेफत वह्यांचे वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य.विदयालय मांडकुली- केरवडे (कुडाळ) येथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उत्तमोत्तम दर्जेदार शिक्षण घेऊन यशवंत, किर्तीवंत व्हा व शाळेचे नाव उज्वल करा असे विद्यार्थ्यांना पालकमंत्री रविंद्र चव्हण यांचा शुभसंदेश वाचून दाखवण्यात आला.

कार्यक्रमास केरवडे गावचे उपसरपंच अर्जून परब,मांडकुली ग्रा.पं सदस्य महेश नाईक,मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तवीक गोवेकर सर यांनी केले.मुख्याध्यापक खोत सर यांनी प्रशलेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे भाजपा कुडाळ तालुका युवा अध्यक्ष रुपेश कानडे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे प्रशालेच्यावतीने आभार मानले.

error: Content is protected !!