वैभववाडी शहरात रात्री पोलिस प्रशासनाने गस्त घालावी व्यापारी वर्गाची मागणी

वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेकडून पोलिस निरीक्षक यांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात काही महिन्यांपुर्वी चोरट्यांनी काही दुकाने, मेडीकल फोडली होती.बऱ्याच दिवसानंतर पुन्हा वैभववाडी शहरात शनिवारी रात्री त्याची पुनरावृत्ती दिसून आली बंद असलेल्या मेडीकल व बेकरी दुकानात चोरीचा प्रकार घडला. या पार्शवभूमीवर आज वैभववाडी व्यापारी संघटनेने पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांची भेट घेऊन बाजारपेठेत पोलीस प्रशासनाकडून बंद असलेली गस्त पुन्हा सुरू करावी या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनास दिले.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर,अरविंद गाड,सुरेंद्र नारकर,नितेश पाटील,संजय लोके,वसंत पटेल, बाळु शिरावडेकर आदी व्यापारी ऊपस्थित होते.

error: Content is protected !!