मसूरे (प्रतिनिधी) : ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुप कट्टा पेंडूरचे सदस्य नेहमीच चालणे, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग करत असतात. नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 21किमी साठी डॉ.सोमनाथ परब, जगदीश पेंडूरकर,रूपेश भोजणे. 10 किमी साठी डॉ मृण्मयी परब,रमेश गावडे,प्रकाश सरमळकर. 5 किमी साठी डॉ .शरद काळसेकर डॉ जी.आर सावंत, प्रेरणा लोहार हे सहभागी झाले होते.
या ग्रुपचे सदस्य तथा वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक व पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांचे नुकतेच निधन झाले. ते सर्वांसाठी प्रेरणादायी होते म्हणून ग्रुपच्या सदस्यांनी या स्पर्धेत धावताना सरांचा फोटो असलेले टीशर्ट घालून त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या.
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या सदस्यांची लक्षवेधी कामगिरी!











