रत्नागिरी महामार्गावर केर्ली दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर

पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे केली बंद

काेल्हापुर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते केर्ले दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पूर्णपणे बंद केली.

पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळीच या रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यानंतर काही काळ या महामार्गावरील वाहतूक पाण्यातूनच सुरु होती. मात्र पाणी अर्धा फुटावर वाढले असून पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक वाहने खोळंबली आहेत.

हा महामार्ग बंद झाल्याने वाहने केर्ली येथून जोतिबा – दाणेवाडी – वाघबीळ या पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीयत. दरम्यान कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी, रेडेडोह, रजपूतवाडी, चिखली फाटा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी लागले आहे. याठिकाणी रस्त्यावर एक दोन फूट पाणी आलं तर केर्ली जोतिबा वाघबीळ हा पर्यायी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!