केंद्र शासनाच्या माध्यमातून 1200 कोटी निधी उपलब्ध

सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात वीज वाहिन्या भूमिगत होणार

अधिक क्षमतेच्या ट्रान्सफार्मरची उभारणी होणार

जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांची माहिती

चौके (अमोल गोसावी) : केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध 1200 कोटी निधीतून सिंधुदुर्ग किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत केल्या जाणार असून आवश्यक ठिकाणी अधिक क्षमतेच्या ट्रान्सफार्मरची उभारणी होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा महत्वपूर्ण राहिला अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, अशोक सावंत यांनी मंगळवारी कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांची भेट घेऊन किनारपट्टी भागात होणाऱ्या कामांची माहिती जाणून घेतली. यावेळी मच्छिमार नेते दाजी सावजी उपस्थित होते. मालवण, वेंगुर्ला, देवगड तालुक्यातील किनारपट्टी भागात वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. तसेच अनेक ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवली जाणार आहे. त्यामुळे कमी वीज समस्यां मार्गी लागणार आहेत. लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता यांनी दिल्याचे अशोक सावंत यांनी माहिती देताना सांगितले आहे.

भाजपा महायुती सरकार व खा. नारायण राणे यांचे आभार
भाजपा महायुती सरकार माध्यमातून मोठया प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होत असून भूमिगत वीज वाहिन्यांसाठीही सरकारच्या माध्यमातून शेकडो कोटी उपलब्ध झाले आहेत. गेली तीनवर्ष खा. नारायण राणे साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठया प्रमाणात विकासनिधी आणत असल्याचे सांगत अशोक सावंत यांनी भाजपा महायुती सरकारचे व खा. नारायण राणे यांचे जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

आमदार वैभव नाईक अपयशी ; जनता घरी बसवणार
गेली दहा वर्षे आमदार असलेले वैभव नाईक पूर्णपणे अपयशी ठरले. महाविकास आघाडीच्या काळात कोणताही निधी उपलब्ध करू शकले नाहीत. मात्र आता भाजपा महायुती सरकार माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचे श्रेय मिळवण्याच्या केविलवाणा प्रयत्न आ. वैभव नाईक करत आहेत. अपयशी कार्यकाळ ठरलेल्या विनायक राऊत यांना जनतेने घरी बसवले त्याच प्रमाणे वैभव नाईक यांनाही जनता घरी बसवणार असा टोला अशोक सावंत यांनी या निमित्ताने लगावला.

error: Content is protected !!