आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील जय बजरंगबली मित्रमंडळाच्या वतीने २८ ते २९ जानेवारी या कालावधीत अंडरआर्म स्टेट ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ रुपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत संघाची नावनोंदणी करण्यासाठी अवधूत गावकर (8104467805), रोहन गावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












