जिल्ह्यात येणारे पर्यटक वाहनांवर पोलिसांचे चिन्ह, लोगो वापरून दहशत माजवितात

मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांची पाेलीस अधिक्षकांकडे कारवाईची मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पर्यटनाला येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या वाहनावर पोलिस विभागाची पाटी किंवा पोलिस विभागाचे चिन्ह लावून येतात. ही पाटी किंवा लोगो हा दहशत माजविण्यासाठी की नागरिकांना घाबरविण्यासाठी लावली जाते? अशा गाड्यांमधून अवैध धंदे चालविले जात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस विभागाचे चिन्ह किंवा पाटी असलेल्या वाहनावर राज्यपालांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल याच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यतः मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळे यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला, जलक्रीडा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यात सर्वसामान्य नागरिकांसह देशी विदेशी नागरिक, अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असतो. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक गाड्यांवर पोलिस विभागाचा लोगो किंवा पोलिस अशी पाटी लावलेली आढळून येते. मात्र अशा पाट्या कशासाठी लावल्या जातात याचा पोलिस विभागाने शोध घ्यावा. या पाट्या दहशत निर्माण करण्यासाठी की नागरिकांना घबरविण्यासाठी लावल्या जातात? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अशा पाट्या लावून या गाड्यांमधून अवैध धंदे तर नाही ना चालत अशी ही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस विभागाचे चिन्ह अथवा पोलिस अशी पाटी लावलेल्या वाहनावर राज्यपालांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!