ब्यूरो न्यूज (मुंबई) : नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पोलीस दाऊदी शेखची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. त्याने यशश्रीला का मारले या प्रश्नासंबंधी आणि इतर तपास पोलीस करत आहेत.
दाऊद शेख याला कर्नाटकच्या गुलबर्गा येथून मंगळवारी अटक करण्यात आली. पहाटे पाच वाजता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. यशश्रीची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. यशश्री आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मैत्री होती. उरणमध्ये दोघेही एकाच परिसात राहायला होते. यशश्रीच्या कुटुंबियांनी त्या्च्याविरोधात तक्रार दिल्यानंतर दाऊद विरोधात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता.











