ग्राहकांकडून घरपोच गॅससाठी जादा 50 रु घेत असल्याचा अण्णा कोदे यांचा आरोप
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरालगत च्या गावातील घरगुती गॅस ग्राहकांना घरपोच गॅस वितरणासाठी अतिरिक्त 50 रु मागितले जात असून याची चौकशी करावी अशी मागणी भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, हरकुळ बुद्रुक उपसरपंच सर्वेश दळवी, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते. अण्णा कोदे यांनी तहसीलदार देशपांडे यांच्याशी याबाबत चर्चा करताना आरोप केला की कणकवली शहरालगत च्या गावांत घरगुती गॅस वितरण करताना ग्राहकांकडून अतिरिक्त 50 रु प्रति सिलेंडर घेतले जातात. तसेच गॅस सिलेंडर चे वितरण नियमित केले जात नाही, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते.याबाबत चौकशी करून गॅस एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी कोदे यांनी चर्चेदरम्यान केली. तहसीलदार देशपांडे यांनी याबाबत चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले.