असा नडलो की नरेंद्र मोदींना घाम फोडला; मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकी तउद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

ब्यूरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळालं असून, आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीला कडवं आव्हान दिलं. उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांच्या बैठकीत याचा उल्लेख करताना असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला असं विधान केलं आहे. मुंबईत शाखा प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपावर हल्लाबोल केला.

“लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

error: Content is protected !!