आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या मनसे पक्षनिरीक्षक सावंतवाडीत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी तसेच विधानसभा निवडणुकीबाबत चाचपणी करण्यासाठी विधानसभा निवडणुक पक्ष निरीक्षक मनसे नेते व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व बंटी हशीलकर हे उद्या गुरुवार दिनांक १ ऑगस्टरोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांनी दिली आहे. सकाळी १०:३० वाजता हॉटेल शिल्पग्राम सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या बैठकीला सावंतवाडीविधानसभा मतदान संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अँड, अनिल केसरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!