बांदिवडे – भगवंतगडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी ६.६९ कोटींचा निधी मंजूर

राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून निधी ; खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपा नेते निलेश राणेंचे विशेष प्रयत्न

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मसुरे, चिंदर, बांदिवडे गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असलेला भगवंतगड किल्ला नजिकच्या बांदिवडे – भगवंतगडला नवीन पुल मंजूर झाला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्यातून या पुलासाठी ६ कोटी ६९ लाख ८९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून या पुलामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. या पुलासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खा. निलेश राणेंनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

या ठिकाणी असलेल्या कॉजवेच्या ठिकाणी पूल होण्यासाठी येथील भगवंतगड बादीवडे मसुरे पुल कृती समिती च्या वतीने मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर तथा बाबुराव प्रभू गावकर हे गेली अनेक वर्ष शासनाकडे पाठपुरावा करत होते. या पुलाच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केली होती. यावेळी सुद्धा प्रभू गावकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, खासदार नारायण राणे यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला होता. या पुलाला निधी उपलब्ध झाल्यामुळे भगवंतगड बांदिवडे मसुरे पूल कृती समितीच्या वतीने सुद्धा प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती मधुकर प्रभू गावकर यांनी दिली. आचरा – भगवंतगड मार्गावरील या ठिकाणी ब्रीज कम बंधारा होता. मात्र या बंधाऱ्या वरून अनेक वेळा पाणी जात असल्याने ग्रामस्थांची ये जा करताना मोठी गैरसोय होत होती. यावेळी लगतच्या गावातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा संपर्क तुटत होता. त्यामुळे याठिकाणी मोठा पूल उभारण्याची मागणी तिन्ही गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतिकडून करण्यात येत होती. अखेर भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने हा ब्रीज मंजूर करण्यात आला आहे. या ब्रीजमुळे अनेक गावांना वाहतूक सुलभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!