कै.अरुण खाडिलकर शोकसभा आज 2 ऑगस्ट रोजी दादर येथे

मसूरे (प्रतिनिधी) : मसुरा एज्युकेशन सोसायटी, मुंबई या शैक्षणिक संस्थेचे माजी चिटणीस अरुण महादेव खाडिलकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. दिवंगत खाडिलकर सर हे मसुरे पंचक्रोशीतील विविध सामाजीक व शैक्षणिक संस्थांशी जोडले गेले होते. दिवंगत अरुण खाडिलकर सर यांना सर्व संस्था प्रतिनिधींनींतर्फे एकत्रित श्रध्दांजली अर्पण करता यावी यासाठी शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट, २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता छबिलदास मुलांचे विध्यालय, दादर पश्चिम येथे शोक सभेचे आयोजन करण्यांत आले आहे. तरी मसुरे पंचक्रोशीतील मुंबई ठाणे या उपनगर परिसरात वास्तव्य करीत असलेले सर्व संस्था प्रतिनिधी, ग्रामस्थ, मित्र परिवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मसूरे एज्यूकेशन सोसायटी अध्यक्ष उद्योजक डॉ दीपक परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!