सर्व्हिस सुधारा …अन्यथा माझ्याशी गाठ
कणकवली (आनंद तांबे) : यंदाच्या वादळ वारा पावसाळ्यामुळे कणकवली तालुक्यामधील निर्माण झालेल्या विद्युत समस्यांमुळे जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याची दखल घेऊन आज कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज गुरुवार 1 ऑगस्ट रोजी प्रहार भवन कणकवली येथे दुपारी 12:30 वाजता पार पडली. सदरहू बैठकीसाठी महावितरणचे अधिक्षक अभियंता अशोक साळुंखे आपल्या सर्व अधिकारी वर्गासह उपस्थित होते. तरी तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व जनतेने या बैठकीला उपस्थित राहुन आपल्या गावातील व विभागातील वीज वितरणाबाबत समस्या मांडल्या त्यांनी वितरण संदर्भात प्रश्न मांडले. ते प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी. कारण या भागाचा लोकप्रतिनिधी मी आहे. मला कारण देऊन चालणार नाही. आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी झाली अधिकारी फोन उचलत नाहीत अशा तक्रारी आहेत. या पुढील काळात गणेश चतुर्थी आहे चाकरमणी येणार आहेत. त्यामुळे आलेल्या समस्या येत्या 15 दिवसात मार्गी लावा अन्यथा गाठ माझ्याशी आहे. असा इशारा वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिला.
यावेळी कणकवली, देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, मंडळ अधिकारी संतोष कानडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अधिक्षक अभियंता सिंधुदुर्ग मंडळ अशोक साळुंके, कार्यकारी अभियंता कुडाळ अजित पालसिंह दिनोरे, उपकार्यकारी अभियंता उपविभाग कणकवली विलास बगडे यावेळी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये वीज समस्यांबाबत प्रश्नांचा विविध गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी केला त्यामध्ये गावातील नळपाणी योजनां च्या वीज लाईनवर मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या व वेली वाढलेल्या आहेत.वीज पोल खराब झाले आहेत. त्यामुळे नळ पाणी योजना बंद पडल्या आहेत. गावातील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असतो लाईनीवर झाडांच्या फांद्या व वेली आहेत त्या केव्हा काढणार. वीज पोल मोडलेली आहेत ते केव्हा उभारण्यात येणार. तीन ते चार दिवस विद्युत पुरवठा नसल्याने अनेक घरे काळोखात आहेत. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत आहेत.यासारखे अनेक प्रश्न सरपंचांनी मांडले त्यावर बरेच अधिकारी निवृत्त झाले.
वीज वितरणाच्या चुकीमुळे फोंडाघाट येथे.२ म्हैशी मृत्युमुखी पडल्या.त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. शेतीपंपाचे वीज कनेक्शन दिले जात नाही. फोंडाघाट येथे ५ किलोमीटरच्या आत वीज निर्मिती केंद्र असताना देखील विद्युत पुरवठा खंडित का होतो? वाघेरी येथे ३ ते ४ दिवस लाईट नाही. नळपाणी योजना बंद आहे. पोल पडलेल्या अवस्थेत आहेत. सांगवे येथील झाडी केव्हा तोडणार. आम्ही २ महिने मागे लागलो पण कामे केली जात नाहीत. नरडवे येथे 70 सालापासून विज लाईन आहे. पोल पडतात,पडत आहेत, नवीन लाईन मिळावी दिगवळे येथे पोल पडणार आहेत. धोकादायक लाईनी आहे. अधिकारी फोन उचलत नाहीत. असलदेत नळपाणी योजना लाईनची झाडी साफसफाई व १५ ते १६ पोल धोकादायक बनले आहेत. घोनसारीत विज लाईन बदलून मिळावी. खारेपाटण मधील पाण्यातील ट्रान्सफॉर्मर उंच जागेवर घेण्यात यावा. वागदे येथील फिडर स्वतंत्र करण्यात यावा या सह.विविध गावातील समस्या सरपंचांनी मांडला त्यावर प्रभारी कार्यकारी अधिक अभियंता बगडे व संबंधित सहाय्यक अभियंत्यांनी सकारात्मक उत्तरे देऊन तातडीने समस्या मार्गी लावण्याची हमी आमदार नितेश राणे यांच्या समक्ष दिली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी माझ्या समक्ष बाजूला बसून लोकांना दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे पुन्हा पंधरा दिवसांनी आढावा घेणार त्यात 80 टक्के कामे पूर्ण झालेली असावीत अशा सूचना अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या