खारेपाटण रामेश्वर नगर जि.प.शाळा येथे भाजप पक्षाच्या वतीने वह्या वाटप….

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने भाजप पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील रामेश्वर नगर, खारेपाटण जि.प. शाळा येथे नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप खारेपाटण सरपंच सौ.प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

यावेळी भाजप खारेपाटण विभाग शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे,माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर कुबल,खारेपाटण ग्रा.पं. सदस्य किरण कर्ले, मनाली होनाळे, धनश्री ढेकणे, शितिजा धुमाळे,अमिषा गुरव,दक्षता सुतार,बूथ अध्यक्ष शेखर शिंदे,शेखर कांबळी,राजू राऊत,भाजप महिला कार्यकर्त्या उज्ज्वल चीके,रामेश्वर नगर जि.प.शाळेचे मुख्यध्यापक श्री धुळप शिक्षिका श्रीम.झगडे मॅडम,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण रामेश्वर नगर जि.प. शाळेतील विद्यार्थ्याना मान्यवरांच्या शुभहस्ते वह्या वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या शैशनीक साहित्याचा योग्य उपयोग करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सरपंच प्राची ईसवलकर यांनी विद्यार्थ्यांना केले.तर माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!