पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी पुन्हा एकदा शिवराज नाईकवडे यांची नियुक्ती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी शिवराज नाईकवडे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांच्याकडून तडकाफडकी कारभार काढून घेवून त्याठिकाणी राधानगरी कागलचे प्रांताधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांची नियुक्ती केली होती. यावेळी कोल्हापुरातील भाविकांनी आंदोलन देखील केलं होतं. आज पुन्हा एकदा शिवराज नाईकवडे यांची सचिवपदी नियुक्ती केल्यामुळं सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नायकवडे यांना नियुक्तीचं पत्र दिल आहे..

error: Content is protected !!