चौके येथे 20 ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर

वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळाचे आयोजन

चौके (अमोल गोसावी) : जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग व न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळ, चौके यांच्यावतीने मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी चौके येथील भ. ता. चव्हाण, म. मा विद्यालय येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरात उच्च रक्तदाब तपासणी, इजीसी, शरीरातील ऑक्सिजन तपासणी, शरीराचे तापमान मोजणे, त्वचारोग निदान, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, गरोदरपणाची तपासणी, लघवीची तपासणी, गुप्तरोग संदर्भात तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, मलेरिया डेंग्यू निदान, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी तसेच या आरोग्य शिबीराबरोबर नेत्र तपासणी शिबीर याशिवाय सर्व आजारावर मोफत आरोग्य सल्ला व कमीतकमी किमतीत औषधे देण्यात येणार आहेत.
तरी चौके गावातील सर्व ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा तसेच नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळ चौके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!