फसवणूक प्रकरणी आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांचा यशस्वी युक्तिवाद

कुडाळ (प्रतिनिधी) : बनावट नोटा बँकेत भरल्याबद्दल अटकेत असलेला आरोपी सुरेंद्र उर्फ सूर्या रामचंद्र ठाकूर रा. पलूस, सांगली व त्याच गुन्ह्यात नंतर अटक झालेला आरोपी विजय रविकांत शिंदे रा. मुळदे यांना लक्ष्मण दत्ताराम कदम रा. कुडाळ यांची बँकेचे लोन करून देतो असा बहाणा करून फसवणूक केल्याप्रकरणी दिनांक 16/08/2024 रोजी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.

यातील आरोपी सुरेंद्र ठाकूर हा दिनांक 9/08/2024 पासून व आरोपी विजय शिंदे हा दिनांक 10/08/2024 पासून पोलीस कोठडीत होता.सदर कालावधीमध्ये पोलीस बनावट नोटा प्रकरणाची चौकशी करण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करता आलेला नाही असा युक्तिवाद सरकारतर्फे वकील हृदयनाथ चव्हाण यांनी केला.

error: Content is protected !!