नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस संतोष कानडे व कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी नव्याने निवड झालेले भाजपचे पदाधिकारी श्री संतोष कानडे व कणकवली तालुका अध्यक्षपदी श्री दिलीप तळेकर यांची नुकतीच पक्षाच्या वतीने निवड करण्यात आल्याने खारेपाटण विभाग भाजप पक्षाच्या वतीने नुकताच त्यांचा विभागात विविध ठिकाणी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार, माजी जि.प.महिला बाल कल्याण सभापती श्रीम.रत्नप्रभा वळंजू,माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण विभाग भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर कुबल,सूर्यकांत भालेकर,राजेश जाधव खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,तळेरे सरपंच हनुमान तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण,कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच बबलू पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजप पक्षाच्या वतीने बाळा जठार व रत्नप्रभा वळंजू यांच्या शुभहस्ते भाजप पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस संतोष कानडे व कणकवली तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला खारेपाटण – तळेरे विभागातील भाजप पक्षाचे सरपंच,उपसरपंच तसेच सर्व बूथ अध्यक्ष आणि भाजप पक्षाचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप कार्यकर्ते श्री मुल्ला यांनी केले.














