संविता आश्रमच्या टिमने गुगलद्वारे शोधले महिलेचे गाव आणि नातलग
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवलीतील कलमठ कुंभारवाडी येथून कणकवली पोलीसांनी बलमल्ला नागेंद्रम नावाच्या एका निराधार महिलेला जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांच्याशी संवाद करून पणदूरच्या संविता आश्रमात दि. १६ आँगस्ट २०२४ रोजी दाखल केले. यावेळी महिला पोलीस अधिकारी भागवत यांचेसह संविता आश्रमचे माधव पाटिल व मयुरी परब उपस्थीत होते.
सदर महिला मानसिक आजारी अवस्थेत आंध्रप्रदेशातील मु.उंगुटुरू ता.अमरावती,जि.गुंटूर येथून घरातून जी बाहेर पडली ती तब्बल २० दिवसांनी थेट पोहचली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे दरम्यानच्या मधल्या काळात सदर महिलेकडील कपडे, घरचा पत्ता, संपर्क नंबर असलेले कागदपत्र आणि पैसे असलेली बँगही गहाळ झाली. त्यामुळे पोलीसांनी या महिलेला काळजी आणि संरक्षणासाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले.
जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांचेसह संविता आश्रमच्या विजया कांबळी, प्रतिक्षा चव्हाण या कार्यकर्त्यांच्या टिमने गुगल सर्चद्वारे महिलेचे आणि गाव व नातलगांशी संपर्क करण्यात यश मिळविले. महिलेचा मुलगा लुदरन पाल याचेशी व्हिडिओ काँलद्वारे तरसंवादही झाला. लवकरच सदर महिलेचे तिच्या कुटुंबात कुटुंब पुनर्मिलन होईल, अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करण्यात आहे.














