वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसुर वरची बौद्धवाडी येथील रमण उर्फ रमाकांत यशवंत यादव यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 65 व्या वर्षी मुंबई येथील केईएम हॉस्पिटल मध्ये आकस्मित निधन झाले. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे अधिक उपचारासाठी ते मुंबईला गेले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. कुसुर विकास बौद्ध मंडळाच्या ग्रामीण शाखेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सून नातवंडे भाऊ असा मोठा परिवार आहे.
कुसुर वरची बौद्धवाडी येथील रमण उर्फ रमाकांत यादव यांचे हृदयविकाराने निधन












