घोणसरी शाळा नंबर ३ ची कु. साहीशा राणे हिचा स्वातंत्र्यदिनी गौरव !

पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव

फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथून दोन किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातील वाडीवर घोणसरी शाळा नंबर तीन ची विद्यार्थिनी, कु. साहीशा भालचंद्र राणे ही नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (एसटीएस ) परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्याबद्दल स्वातंत्र्यदिनी तिचे पालक भालचंद्र राणे यांचे सह माजी मुख्याध्यापक श्रीराम निनावे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह- सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना चव्हाण, सहशिक्षिका सरिता परीट, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा राणे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आराध्या राणे,उपाध्यक्ष स्वरा राणे ,अंगणवाडी सेविका अनिता राणे , सुविधा राणे ,तसेच साळस्कर ,प्रसाद राणे आणि अन्य पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी साईशाला मार्गदर्शन करणारे माजी मुख्याध्यापक श्रीराम निनावे आणि सहशिक्षिका आस्था फोंडेकर यांचाही पालक वर्गाकडून गौरव करण्यात आला. साहीशाच्या यशाचे घोणसरी मध्ये कौतुक होत आहे.

error: Content is protected !!