30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससी कंबाईन व तलाठी साठी 25 मार्च पासून विशेष फाटस्ट्रॅक बॅच
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या शनिवार दिनांक 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग आणि एस आर एम कॉलेज कुडाळ यांच्या संयुक विद्यमाने कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी आगामी एमपीएससी, संयुक्त परीक्षा,तलाठी, सरळसेवा अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत उपस्थित रहावे.
सरकारी खात्यात होणाऱ्या आगामी विविध पदांच्या भरती संदर्भात एमपीएससी ने 8169 जागांची घोषणा केली असून परीक्षा 30 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. तसेच 673 जागांसाठी 4 जून 2023 व तलाठी – सरळसेवा अशा एकूण 13000 जागांची मोठी भरती परीक्षा अंदाजे एप्रिल मे मध्ये घेतली जाणार आहे. युनिकच्या माध्यमातून अनेक अधिकारी जिल्ह्यात विविध सरकारी खात्यात कार्यरत असून, पुणे मुंबई चे तज्ञ मार्गदर्शक, माफक फी, टेस्ट सिरीज विशेषणासह ,नोटस, अभ्यासिका अशा सुविधा उपलब्ध आहेत. याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन आगामी परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करावे असे आवाहन युनिक च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9960658458 या नंबर वर संपर्क साधावा.