देवगड (प्रतिनिधी) : तांबळडेग येथे निसर्ग मित्रमंडळाच्या सीने ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या ६१० पिल्लांना गुरूवारी रात्री समुद्रात सुखरूप सोडते. देवगडतालुक्यातील तांबळडेग येथे समुद्री कासवांचे संवर्धन केले जाते. या भागात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. तांबळडेग येथील सागरमित्र सागर मालडकर हे गेली २५ वर्षे कासव संवर्धन करीत असून अंड्यातून पिल्ले बाहेर आली की त्या पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडले जाते. मालडकर आणि त्यांच्या निसर्ग मित्रमंडळाच्या टीमने कुंपण घालून कासवांची अंडी संरक्षित करून ठेवली होती. मार्च महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यास सुरूवात झाली. जवळपास २५ घरटे संरक्षित करण्यात आली होती त्यातील सहा घरट्यातीत अंड्यांमधून ६१० पिल्ले बाहेर पडली असून सागरमित्र मालडकर यांनी ती सुखरूप समुद्रात सोडली. यावेळी वन्यजीव अभ्यास प्रा. नागेश दप्तरदार उपस्तित होते.