कनेडी प्रशालेच्या आठवडा बाजाराला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशाले अंतर्गत वार रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी कनेडी बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार हा उपक्रम आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आयोजन केले.

विद्यार्थ्याला आर्थिक व्यवहार व आर्थिक ज्ञान प्राप्तीसाठी या उद्देशाने आठवडा बाजार ही संकल्पना राबविण्यात आली. बाजारात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू खरेदी विक्री, आर्थिक ज्ञान व व्यवहार कौशल्य आत्मसात होण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रातील उत्पादनाची माहिती होण्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम प्रशाले अंतर्गत राबविण्यात आला.

या उपक्रमात इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले. मुलांना प्रत्यक्ष बाजारपेठेतील खरेदी विक्री अनुभव घेता आला. बाजारात मुलांनी रानभाज्या,भाजीपाला घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ तसेच बचत गटांनी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्य पदार्थ व वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून आकर्षित केले. बाजारातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात रान भाज्यांना पसंती देत खरेदीची लयलूट केली. या मुलांच्या आठवड्या बाजाराला प्रभावीत होऊन नाटळ गावचे सुपुत्र, दशावतार नाटकाचे सर्वेसर्वा, प्रशालेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करणारे रवींद्र मेस्त्री उर्फ वादळ मेस्त्री यांनी बाजारातील सहभागी मुलांना अल्प उपहार उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन दिले. संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, शालेय समितीचे चेअरमन आर.एच. सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मुलांचा उत्साह वाढवला. शालेय समिती सदस्य बावतीस घोन्सालवीस, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, मकरंद आपटे, प्रसाद मसुरकर, देवेंद्र सावंत,मंदार मेस्त्री, भिवा कोरडे, मंगेश ठाकूर,पल्लवी हाटले मॅडम, शिल्पा साटम मॅडम, श्रावणी कदम, विद्या यादव, हाफिजा पटेल या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बाजारातील विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू व भाजीपाला उत्स्फूर्तपणे खरेदी केला. तसेच बाजारातील सर्व ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!