ओंकार मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; आरोग्य शिबिराचा गरजू ग्रामस्थांनी घेतला लाभ

कणकवली (प्रतिनिधी) : ओंकार मित्रमंडळ, कलमठ बाजारपेठ आयोजितरक्तदान आणि आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार 1 सप्टेंबर रोजी रक्तदान , आरोग्य शिबीर पार पडले. त्यामधे 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच 70 ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. 

त्यामधे RBS Test,HBA1C Test,BP Test, BMI Test आणि रक्तगट तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या शिबिरासाठी ओंकार मित्रमंडळ अध्यक्ष धीरज श्रीधर मेस्त्री, खजिनदार- सागर गावडे, सचिव- नीलेश महेंद्रकर, तनोज कळसुलकर, महेश लाड, अनिल मेस्त्री, किशोर लाड, विनय खोचरे, सत्यवान चव्हाण, नितीन पेडणेकर, राजन कुशे, प्रथमेश धुमाळे, तेजल हजारे आदी सदस्य उपस्थित होते.

या शिबिरासाठी अमेय मडव  आणि स्नेहल हजारे (सिंधुरक्तमित्र, कणकवली) यांनी मदतीचा हातभार लागला. तसेच सिंधुरक्तमित्र,कणकवली कडून चांगल्या  रक्तदान शिबिरासाठी गौरवण्यात आले.

error: Content is protected !!